कोल्हापूर- दि.२५- राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या शिक्षण, संशोधन व कृषि विस्ताराच्या कार्यामध्ये समन्वय व सुसूत्रता आणण्याचे काम पाहणाऱ्या पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी सातारा जिल्ह्यातील बेलवडे हवेली येथील युवा प्रगतिशील शेतकरी मा. श्री. तुषार बाळासाहेब पवार यांची निवड झाली आहे. श्री. तुषार पवार यांनी यापूर्वी राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सलग तीन वेळा कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम पाहिले असून ते राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयाचे २००७ च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. कृषि परिषदेच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार श्री. तुषार पवार यांनी नुकताच स्वीकारला याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड यांनी आपल्या भेटीदरम्यान मा. तुषार पवार यांची कृषि परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व आपल्या कृषि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कृषि परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवडला गेल्याचा महाविद्यालयास सार्थ आनंद व अभिमान असल्याच्या भावना व्यक्त केल्या तसेच महाविद्यालयाच्या विकासासाठी भरीव कार्याची अपेक्षाही व्यक्त केली. महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या माजी विद्यार्थ्यांस मिळाल्याबद्दल कृषि महाविद्यालयाच्या सर्व स्तरातून आनंद व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी मा. श्री. तुषार पवार यांची निवड
By Administrator|2024-09-26T11:24:00+05:30September 26, 2024|image gallery, News & Events|Comments Off on महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी मा. श्री. तुषार पवार यांची निवड
Share This Story, Choose Your Platform!
About the Author: Administrator
Related Posts
-
राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. Gallery
राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.