राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आयोजित करण्यात आला होता. यादिवशी सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी त्यांच्या कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापन केले. दुपारच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना आणि Agricos Career Devlopment Forum यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर पतंगे, विद्याशाखा समन्वयक व इंजी. अजय देशपांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला . या कार्यक्रमासाठी श्रीमती. सुनिता नेर्लीकर, तहसीलदार व श्री. पंकज गिरी, पोलिस सब इन्स्पेक्टर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ. रवींद्र बनसोड, सहयोगी अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. मनीषा मोटे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आयोजित
By Administrator|2024-09-26T11:24:42+05:30September 9, 2024|image gallery, News & Events|Comments Off on राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आयोजित